Shrikant shinde On Sanvidhan : इंदिरा गांधी का संविधान विरोधी होत्या का?

Continues below advertisement

Shrikant shinde On Sanvidhan : इंदिरा गांधी का संविधान विरोधी होत्या का?

 लोकसभेत संविधानाच्या 75 वर्षांच्या निमित्तानं आयोजित करण्यात आलेल्या चर्चेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या सरकारच्या निर्णयांची माहिती दिली.  याशिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंडित जवाहरलाल नेहरु आणि इंदिरा गांधी यांच्या निर्णयावर टीका केली. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का दिला, असं नरेंद्र मोदी म्हणाले. 

नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत बोलताना म्हटलं की मी संविधानामुळं इथपर्यंत पोहोचलो आहे, संविधानामुळं आमच्यासारखे लोक पंतप्रधान झाले, असं म्हटलं. जवाहरलाल नेहरु यांनी 1951 मध्ये अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला केल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली.  

नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की काही लोकांनी अपयशाचं दु:ख प्रकट केलं. या देशाच्या जनतेला नमन करतो, ते संविधानासोबत राहिले आहेत, असं मोदी म्हणाले. काँग्रेसच्या एका कुटुंबानं संविधानाला धक्का देण्यामध्ये गेल्या 55 वर्षात काही सोडलं नाही. काँग्रेसच्या काळात लोकशाहीचा गळा घोटला गेला. आणीबाणीच्या काळात देशाला तुरुंग बनवण्यात आलं होतं, असा आरोप मोदींनी केला.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram