Shrikant Shinde On Aaditya Thackeray : आदित्य ठाकरेंना सगळं काही बाळासाहेबांमुळे मिळालं!
कल्याण-डोंबिवलीचे खासदार आणि मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांनी आज आदित्य ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला. डोंबिवली हे आदित्य यांचं आजोळ आहे, त्यांनी तिथून निवडणूक लढून दाखवावी, असं थेट आव्हान श्रीकांत शिंदे यांनी दिलं आहे. चर्चा करायची आहे तर मातोश्री वन नंतर मातोश्री-२ कशी उभी राहिली, एवढी संपत्ती कुठून आली यावर चर्चा करू, असं चॅलेंज देखील श्रीकांत शिंदे यांनी दिलंय. आदित्य ठाकरेंना सगळंकाही बाळासाहेबांमुळे मिळालं, मविआ सरकारमधलं मंत्रिपद उद्धव ठाकरेंमुळे मिळालं असा घणाघात देखील श्रीकांत यांनी केला.
Tags :
Aditya Thackeray Election Shrikant Shinde Wealth Kalyan-Dombivli Ministership MP Chief Ministers Son Matoshree One Matoshree-2