श्री संत सोपानकाकांच्या पालखीत मेंढ्यांचं रिंगण, कोरोनामुळे पहिल्यांदात मंदिरात रिंगण सोहळा

श्री संत सोपानकाका पालखीत मेंढ्यांचा रिंगण सोहळा सासवड येथील संत सोपन काका मंदिरात पडला पार पडला. राज्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचा पालखी सोहळा सलग दुसऱ्या वर्षी साध्या पद्धतीने साजरा केला जातोय. आज श्री संत सोपानकाका महाराज पालखीचा रिंगण सोहळा पार पडलाय. हा सोहळा दरवर्षी बारामती जवळच्या पिंपळी गावात होत असतो.  मात्र यंदा सासवडमधील मंदिरातच पार पडला आहे.

दरवर्षी लाखों वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडणारा मेंढ्यांच्या रिंगण सोहळा आज मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा सोहळा साध्या आणि मर्यादित लोकांमध्ये साजरा झालाय. सोपान काकांच्या पालखीचे प्रस्थान 6 तारखेला झालं,  पालखीचे प्रस्थान होऊन मंदिरातच विसावल्यानं रिंगण सोहळाही मंदीराच पार पडला.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola