Shravani Somvar 2021 Pandharpur : पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त विठ्ठल मंदिराला आकर्षक फुलांची सजावट
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
09 Aug 2021 08:55 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appपहिल्या श्रावणी सोमवारनिमित्त पंढरपूरच्या विठ्ठल मंदिराला आकर्षक सजावट करण्यात आली आहे. मुंबईतील डॉ. मंजुळ हुंनूर यांनी विठ्ठलाचरणी फुलांची सेवा अर्पण केली आहे. आज मंदिराला सजावट करताना 'हरी हरा, नाही भेद' हीच थीम ठेवण्यात आली आहे. यामुळेच फुलांमधून महादेवाचे गंध, विष्णूचा शंख साकारला आहे. मंदिरात आरास करण्यासाठी ऑर्किड, कार्नेशियन, शेवंती, कामिनी, ब्लू पी, ड्रॅसीना, जिप्सी अशा देशी-विदेशी फुलांचा वापर करण्यात आला आहे