Aundha Nagnath Temple : औंढा नागनाथ येथे भाविकांची गर्दी, आमदार संतोष बांगरांनी केली पूजा
श्रावणी महिन्याला सुरुवात झाली असून, आज पहिला श्रावणी सोमवार आहे. या निमित्ताने देशभरातील शिवमंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी झाली आहे. आठवं ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरातही दर्शनासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. मध्यरात्रीनंतर दोन वाजता मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले. मराठवाड्यासह विदर्भातून मोठ्या संख्येने भाविक औंढा नागनाथांच्या दर्शनासाठी दाखल झाले. आमदार संतोष बांगर यांनी सपत्निक प्रभू नागनाथांची महापूजा आणि दुग्धाभिषेक केला. मंदिरात स्पेशल दर्शनाची रांग शुल्क भरल्यानंतर उपलब्ध असली तरी, या रांगेतही मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. दूरपर्यंत भक्तांच्या रांगा लागल्या आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेरूनही अनेक भक्त दर्शनासाठी आले आहेत. येथील शिवलिंग गुहारभात असल्याने दर्शन घेण्यासाठी वेळ लागतो. जनरल दर्शनाच्या रांगेत मध्यरात्रीपासून थांबलेल्या भाविकांना तीन ते चार तास रांगेत थांबल्यानंतर दर्शन मिळत आहे.