Shraddha Walkar Murder Case : श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाचा वसईत तपास
वसईतल्या श्रद्धा वालकर या तरुणीच्या तिचा प्रियकर आफताब पूनावालाकडून दिल्लीत झालेल्या हत्या प्रकरणात रोज नवनवीन गौप्यस्फोट होत आहेत. या प्रकरणात दिल्ली पोलिसांच्या पथकानं आज वसई आणि आसपासच्या परिसरात येऊन आठ तास चौकशी केली. या चौकशीत माणिकपूर पोलिसांचं गुन्हे प्रकटीकरण पथक, श्रद्धाचा मित्र लक्ष्मण नाडर तसंच श्रद्धा आणि आफताब यांच्या नायगावमधल्या घरमालकाचा जबाबही नोंदवण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या पथकानं माणिकपूर पोलीस स्थानकात चौकशी केली.
Tags :
Delhi High Court Third Degree Enquiry Drugs Mumbai Police Shraddha Walkar Aftab 35 Pieces Shraddha Walkar Murder NARCO Test Medical Aspects Sodium Pentitol