Primary School : राज्यातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा एक डिसेंबरपासून सुरू,नियमावली लवकरच होणार जाहीर

राज्यातील पहिलीपासूनच्या सर्वच शाळा एक डिसेंबरपासून सुरू होणार आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय. याबाबतची नियमावली लवकरच जाहीर केली जाणार आहे. पहिली ते चौथी या वर्गातील मुले लहान असल्यामुळे त्यांच्या सुरक्षेची काळजी प्रामुख्याने शाळांवर असणार आहे. शाळेतले शिक्षक, मुख्याध्यापक आणि शालेय प्रशासनाला यासंदर्भातले योग्य ते आदेश देण्यात येणार आहेत.सध्या ग्रामीण भागात पाचवी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू आहेत. आता एक डिसेंबरपासून उर्वरित पहिली ते चौथीचे वर्ग भरणार आहेत. तर शहरी भागात सध्या सातवी ते बारावीच्या शाळा सुरू आहेत, मात्र शहरात बहुतांश शाळा अद्यापही बंद  आहे. त्यामुळं शहरातही एक डिसेंबरपासून पहिलीपासूनचे सर्वच वर्ग सुरु होणार आहेत. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola