ShIvsena : आम्हीच सावरकरांचे वारसदार : संजय राऊत
वीर सावरकरांच्या मुद्द्यावरून राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना प्रत्युत्तर दिलं. सावरकर भारत रत्न आहेत. त्यांना भारतरत्न का दिलं जात नाही. सरकारसमोर काय समस्या आहे? असा सवाल त्यांनी केला. बाळासाहेब ठाकरेंनी त्यांचा हिंदुत्वाचा विचार पुढे नेला. आम्ही डरपोक नाही. हिंदुत्वाच्या विचारावर आम्ही कधीच यूटर्न घेतला नाही. आम्ही तडजोडी केल्या नाही. आजही सावरकर आमचे आदर्श होते आणि राहतील. असं संजय राऊत यांनी म्हणटलंय