Maharashtra Politics : धनुष्यबाण शिंदे गटाचा की ठाकरे गटाचा? उद्या होणार निर्णय

Continues below advertisement

शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्हं गोठवल्यास शिवसेनेच्या दोन्ही गटांना कोणतं चिन्हं मिळेल याची चर्चा सुरु झालीय. शिंदे गटाचा कल तलवारीकडे आणि ठाकरे गटाचा कल गदा चिन्हाकडे आहे का अशी चर्चा सुरु झालीय. त्याचं कारण दसरा मेळाव्यात दोन्ही गटांकडून तलवार आणि गदा या शस्त्रांच्या नावाचा उल्लेख आणि प्रतिकृती कार्यकर्त्यांच्या मनावर बिंबवण्यात आल्याची चर्चा आहे. शिंदे गटाच्या मेळाव्यात ५२ फुटी तलवार व्यासपीठासमोर ठेवण्यात आली होती. तर ठाकरे गटाच्या व्यासपीठावरून गदा असा उल्लेख वारंवार करण्यात येत होता. त्यामुळे धनुष्यबाण गोठवला गेल्यास निवडणुकीत दोन्ही गटांची चिन्हं हीच असतील का अशी चर्चा सुरु झालीय. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram