Shivsena : शिवसेनेत बंडखोर आमदारांवर कारवाईचं सत्र सुरू, संतोष बांगर यांची पदावरून हकालपट्टी

एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीनंतर मोठं खिंडार पडलेल्या शिवसेनेनं एकीकडे संघटनाबांधणी सुरू केलेली असली तरी दुसरीकडे बंडखोर आमदार आणि त्यांच्या समर्थकांवर कारवाईचं सत्र सुरू ठेवलंय... अगदी शेवटच्या क्षणी शिंदेंच्या गटात सहभागी झालेल्या संतोष बांगर यांची हिंगोली जिल्हाध्यक्ष पदावरून हकालपट्टी करण्यात आलेय. तर तिकडे आमदार उदय सामंत यांना उघड पाठिंबा देणारे शिवसेनेचे  युवा तालुका अघिकारी तुषार साळवी आणि उप जिल्हा युवा अधिकारी केतन शेट्ये यांना पदावरून हटवलंय आणि आगामी काळात आणखी काही जणांची गच्छंती होण्याची शक्यता आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola