Nashik : शिवसैनीकांनीच उडवाला कोरोनाच्या नियमांचा फज्जा, कारवाई होणार का?
Continues below advertisement
एकीकडे कोरोनाची तिसरी लाट सुरु झाल्याचं चित्र असताना राजकीय नेते आणि कार्यकर्ते मात्र या संकटाला गांभीर्यानं घ्यायला तयार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोरोना नियमावलीचं पालन करण्याचं आवाहन वारंवार करत असताना त्यांच्या शिवसैनिकांकडूनच त्याची पायमल्ली झाल्याचं चित्रं आज नाशिकमध्ये पाहायला मिळालं. शिवसेना मनामनात, शिवबंधन घराघरात या शिवसेनेच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी सगळे नियम धाब्यावर बसवले. या कार्यक्रमात पदाधिकाऱ्यांच्या तोंडावर ना मास्क होता ना सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं जात होतं...... ठाकरे सरकार माझं कुटुंब, माझी जबाबदारी असं अभियान राबवत असताना शिवसेनेच्या कार्यक्रमात नियम पाळण्याची कुणाची जबाबदारी? असा प्रश्न शिवसैनिकांच्या या वागण्यामुळे निर्माण होतोय.....
Continues below advertisement