राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण साहेब... विनायक राऊतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या नावाचा विसर
शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी आंबा घाटाची पाहणी केली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे नाही तर अशोक चव्हाणांचा उल्लेख केला. शिवसेनेच्याच खासदारांना आपलाच मुख्यमंत्री असून जर नावाचा विसर पडत असेल तर इतरांनी कसं भान ठेवावं, यामुळे राजकीय चर्चा रंगू लागल्या आहेत.