Thane Shivsena MNS Banner : दोन मराठी वाघ ठाकरे बंधूंनी एकत्र यावं, ठाण्यात झळकले बॅनर ABP MAJHA

Narayan Rane on Nitesh Rane Statement: महायुतीमध्ये भाजपचा मुख्यमंत्री सगळ्यांचा बाप आहे, अशी टिप्पणी करुन वादाला तोंड फोडणारे राज्याचे मंत्री नितेश राणे यांना आता त्यांचे पिताश्री आणि माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनीच समज दिली आहे. मुख्यमंत्री कोणाचा बाप नसतो. मी नितेशला (Nitesh Rane) समज दिली आहे.  मुख्यमंत्री हा जनतेचा सेवक असतो. मी मुख्यमंत्री असताना मी सांगायचो की, मला साहेब म्हणू नका सेवक म्हणा, अशा शब्दांत नारायण राणे यांनी नितेश राणे यांचे कान टोचले. ते बुधवारी धाराशिवमध्ये आले होते. तुळजाभवानी देवीचे दर्शन घेतल्यानंतर नारायण राणे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. 

यावेळी नारायण राणे यांनी म्हटले की, कोणाचा निधी अडवणं हे चुकीचं आहे. त्याबाबतही मी सूचना देणार आहे, अशी भूमिका मांडत जिल्हा नियोजन समितीच्या निधीबाबतच्या नितेश राणे यांच्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादावर राणेंनी पडदा टाकला. तसेच नारायण राणे यांनी पुन्हा एकदा मनसेचे नेते प्रकाश महाजन यांना लक्ष्य केले. प्रकाश महाजन हा  मेंटल माणूस आहे. त्याच्याशी माझी तुलना का करता? मी दिल्लीला होतो आणि तो इकडे कुठे उभा राहातो क्रांती चौकात, त्याला भेटायला मी यायचं का?, अशा शब्दांत नारायण राणे यांनी संताप व्यक्त केला. तसेच राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत की नाही, याबद्दल मला माहिती नाही. ते एकत्र आले तर चांगली गोष्ट आहे, असे नारायण राणे यांनी म्हटले.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola