'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिकेचा शेवट दाखवू नका; अर्जुन खोतकरांची मागणी

Continues below advertisement
'स्वराज्यरक्षक संभाजी' मालिका सध्या शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र, आता मालिकेचे शेवटचे काही भाग दाखविण्यात येऊ नये अशी मागणी शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी केलीय. मालिकेत संभाजी महाराजांना औरंगाजेबानं कैद केल्याचं दाखवण्यात आलंय. त्यामुळे आता यानंतरची दृश्यं पाहाणं मनाला पटणारं नसून अत्यंत संवेदनशील असा हा विषय आहे असं खोतकरांनी म्हटलंय. त्यामुळे या मालिकेतील असं चित्रीकरण रोखता येईल काय, याबद्दल निर्माते तसेच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असल्याचं खोतकर यांनी सांगितलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram