Shivsena Hearing : महाराष्ट्राच्या सत्ता संघर्षाप्रकरणी ऐतिहासिक सुनावणी आता अंतिम टप्प्याकडे
सुप्रिम कोर्टात सुरू असलेल्या सत्तासंघर्षाच्या सुनावणीचा आज दुसरा दिवस आहे. कालच्या सुनावणीत शिंदे गटाकडून वकील हरीश साळवे, नीरज किशन कौल, मनिंदर सिंह आणि महेश जेठमलानी यांचे युक्तिवाद पूर्ण झाले. आज तुषार मेहता राज्यपालांची बाजू मांडतील, त्यानंतर कपिल सिब्बल ठाकरे गटाच्या वतीनं पुन्हा युक्तिवाद करतील.. सिब्बल यांचा युक्तिवाद झाल्यावर सुनावणी संपण्याची शक्यता आहे. तरीही, आज कामकाज पूर्ण न झाल्यास घटनापीठानं आज आणि उद्याचा वेळ राखीव ठेवला आहे.
Tags :
Constitution Bench Power Struggle Shinde Group Arguments Maninder Singh Hearings SUPREME COURT Power Struggle Lawyer Harish Salve Neeraj Kishan Kaul Mahesh Jethmalani