Shivsena Foundation Day : 'शिवसेनेचा भगवा विजय' शिंदे गटाच्या वर्धापन दिनाची थीम

Continues below advertisement

Shivsena Foundation Day : 'शिवसेनेचा भगवा विजय' शिंदे गटाच्या वर्धापन दिनाची थीम  शिवसेनेतल्या पक्ष फुटीनंतर हा दुसरा वर्धापन दिन आहे.  उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहेत. शिंदेंचा वर्धापन दिन मुंबईत वरळी डोम इथं तर  ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन षण्मुखानंद सभागृहात होणार आहे. लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल आणि तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर या वर्धापन दिनाला महत्त्व आहे.  शिवसेनाच्या वर्धापनदिनानिमित्त ठाकरे आणि शिंदेंच्या मेळाव्याकडे लक्ष, विधानसभेचा रोड मॅप ठरणार, प्रत्येक अपडेट दिवसभर एबीपी माझावर शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्ताने आज नाशिक शहरात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने लाडू वाटपाचे आयोजन करण्यात आले होते... यावेळी ठाकरे गटाच्या वतीने रिमांड होम मध्ये असलेल्या बालकांसाठी आर्थिक मदत म्हणून धनादेश देखील देण्यात आला तसेच या लोकसभेत ठाकरे गटाचे उमेदवार राजाभाऊ वाजे हे विजयी झाल्याने आणि शिवसेना वर्धापन दिनाचे औचित साधून हे लाडू वाटप करण्यात आल्याची माहिती शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी दिलीये... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram