Thackeray vs Shinde : ना विलिनीकरण, ना अपात्रतेची कारवाई, मग फ्लोअर टेस्ट का? Abhishek Singhvi
Continues below advertisement
Maharashtra Political Crisis : सुप्रीम कोर्टात एकनाश शिंदे गट आणि शिवसेनेने दाखल केलेल्या याचिकेवर सरन्यायाधीश रमण्णा यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू झाली आहे. शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंची की बंडखोरी करत फडणवीसांबरोबर सरकार स्थापन करणाऱ्या शिंदे गटाची? कायद्याच्या दृष्टीनं शिवसेनेचे सरसेनापती कोण? उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदे? शिवसेना आमदार, खासदारांनी कुणाचे आदेश मानायचे? ठाकरेंनी नियुक्त केलेल्या प्रतोदांचे की शिंदे गटाच्या प्रतोदांचे? महाराष्ट्रातल्या सत्तासंघर्षानंतर जन्माला घातलेले हे प्रश्न.. आणि देशात कधी नव्हे तो निर्माण झालेल्या अभूतपूर्व राजकीय पेचावर आजपासून सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुुरू आहे.
Continues below advertisement