Shivsena Advay Hire : शिवसेना उपनेते अद्वय हिरे नाशिक ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात
Continues below advertisement
शिवसेना ठाकरे गटाला जोरदार दणका बसलाय. कारण मालेगावचे नेते अद्वय हिरे यांना भोपाळमधून ताब्यात घेण्यात आलं आहे. हिरे यांनी रेणुका सूतगिरणीसाठी NDCC बँकेकडून कडून साडेसात कोटींचं कर्ज घेतलं होतं. हे कर्ज न फेडल्यानं एकूण रक्कम ३० कोटींच्या वर गेली होती. पैशांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता. त्यानंतर हिरे यांनी हायकोर्टात धाव घेतली होती. मात्र हायकोर्टानं जामीन नाकारला. त्यानंतर पोलिसांनी त्यांना तातडीनं ताब्यात घेतलं. हिरे हे दादा भुसे यांचे कट्टर विरोधक मानले जातात. महत्त्वाचं म्हणजे काही महिन्यांपूर्वी उद्धव ठाकरेंची मालेगावात सभा झाली होती. त्याचे आयोजक हिरेच होते. मालेगावचे पुढचे आमदार हिरे असतील अशी भविष्यवाणी तेव्हा संजय राऊत यांनी व्यक्त केली होती.
Continues below advertisement
Tags :
Malegaon Bhopal Debt Money Laundering NDCC Bank Prophecy Sanjay Raut : Uddhav Thackeray Advaya Hire Renuka Sutgirani