Shivsena : आशिष शेलारांनंतर आता शिवसैनिक नितेश राणे यांच्याविरोधात आक्रमक : ABP Majha
भाजप आमदार नितेश राणे यांच्यासमोर सध्या दुहेरी अडचण निर्माण झालेय. एकीकडे नितेश राणेंविरोधात शिवसैनिक आक्रमक झाले आहेत. नितेश राणेंनी राणीच्या बागेसंदर्भात केलेल्या ट्वीटनंतर, शिवसैनिकांनी वरळी पोलीस स्थानकात तक्रारी दाखल केल्या आहेत. मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप नितेश राणेंवर आहे. दुसरीकडे सिंधुदुर्गातल्या कणकवील पोलिसांनीही नितेश राणेंना नोटिस पाठवलेय. हत्येचा प्रयत्न केल्याबाबत एका प्रकरणात चौकशी करत असताना, आरोपीनं नितेश राणे यांच नाव घेतल्याचं समोर आलंय. त्यामुुळे कणकववली पोलिसांनी चौकशीसाठी नितेश राणेंना नोटिस पाठवली आहे.
Tags :
Maharashtra News Shivsena Live Marathi News ABP Majha LIVE Marathi News ABP Maza Top Marathi News Nitesh Rane Aashish Shelar ताज्या बातम्या ताज्या बातम्या Abp Maza Live Omicron Abp Maza Marathi Live Live Tv Marathi News Latest Marathi Live Tv Marathi News