Nanded | वारिस पठाणांचा प्रतिकात्मक पुतळा जाळताना शिवसैनिक पेटला | ABP Majha
एमआयएमचे नेते वारीस पठाण यांनी वादग्रस्त वक्तव्य केल्याचे आता राजकीय परिणाम उमटत आहेत. नांदेड शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर आज सायंकाळी शिवसेनेने वारीस पठाण याच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. पुतळ्याचे दहन करताना उत्साही शिवसैनिक भान हरवून बसले आणि त्याच पुतळ्याचा भडका उडाला. या आगीने तिथे उपस्थित शिवसैनिक राजू मोरे यांच्या अंगावरील कपड्याने अचानक पेट घेतला. परंतु, वेळीच आग विझविल्याने पुढील अनर्थ टळला.