Shivneri Sundari hostesses : शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी, एसटी कर्मचारी संघटेनकडून टीका

Continues below advertisement

 मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदतीसाठी, हवाई सेवेच्या धर्तीवर शिवनेरी सुंदरी नेमण्यात येणार आहे... एस.टी.महामंडळाचे अध्यक्ष म्हणून भरत गोगावलेंनी पदभार स्वीकारताच हा निर्णय घेतला.. पण या निर्णयावर आता विरोधक आक्रमक झालेत.. विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिशाहीन नेते दिशाहीन निर्णय म्हणत टीकास्त्र सोडले... तर महाराष्ट्र एसटी कर्मचारी संघटेनकडूनही हा निर्णय गैरवाजवी असल्याची टीका होतेय... 

एसटीमध्येही विमानाप्रमाणे स्वागत होणार, प्रवाशांच्या मदतीसाठी शिवनेरी बसमध्ये 'शिवनेरी सुंदरी'; भरत गोगावलेंची मोठी घोषणा

मुंबई : मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या एसटीच्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी हवाई सेवेच्या धर्तीवर आदरातिथ्य व्यवस्थापनाची सेवा देणारी परिचारिका 'शिवनेरी सुंदरी' नेमण्यात येणार आहे. या माध्यमातून प्रवाशांच्या तिकिटावर कोणताही अधिभार न लावता प्रवाशांना चांगल्या सेवा सुविधा देऊन गुणात्मक सेवेचा दर्जा उंचावेल अशी अभिनव योजना भविष्यात सुरू करण्यात येणार आहे असे  प्रतिपादन एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी महामंडळाच्या 304 व्या बैठकीमध्ये केले. 
 
एसटी महामंडळाचे नवे अध्यक्ष भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये विविध खात्याच्या तब्बल 70 पेक्षा जास्त विषयांवर चर्चा होऊन त्यांना मान्यता देण्यात आली. त्यापैकी, मुंबई-पुणे मार्गावर धावणाऱ्या ई-शिवनेरी बसमध्ये प्रवाशांना मदत करण्यासाठी परिचारिका नेमण्यास मान्यता देण्यात आली. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram