ShivendraRaje Bhosale: शिंदे साहेबांच्या गटबाजीचा उगमच तुमच्या गावातून होतो ABP Mjaha
आमदार शशिकांत शिंदे हे जावली तालुक्यातून जिल्हा बँकेत अपयशी झाल्यानंतर त्यांनी या अपयशाचे खापर पॅनल प्रमुख रामराजे नाईक निंबाळकर आणि भाजप आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर फोडले होते. ज्ञानदेव रांजणे यांच्या विजयी कार्यक्रमाच्यावेळी आ. शिवेंद्रराजे भोसले यांनी शशिकांत शिंदे यांच्यावर सडकून टीका केली. शशिकांत शिंदे यांच्या अपयशात माझा संबंध नसल्याचे सांगत शशिकांत शिंदे यांना माझा हिशोब चुकता करायचा असेल तर मी कधीही तयार असल्याचे त्यांनी या वेळी भाषणात सांगितले.