मराठा आरक्षणाचं नेतृत्व उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या हातात द्या: शिवेंद्रराजे भोसले
सातारा: अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या अध्यक्षपदावरुन हटवण्यात आल्यानंतर आता माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील यांनी अण्णासाहेब पाटील फाऊंडेशनची स्थापना केली आहे. या निमित्ताने साताऱ्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या प्रसंगी बोलाताना आमदार शिवेंद्रराजेंनी मराठा आरक्षणाचे नेतृत्व उदयनराजे आणि संभाजीराजेंच्या हाती द्यावं असं मत व्यक्त केलं. या कार्यक्रमाला खासदार उदयनराजे होते.
या प्रसंगी माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील म्हणाले की, "मराठा आणि माथाडी कामगारांची चळवळ वडिलांच्या सातारा जिल्ह्यातून व्हावी म्हणून या सोहळ्याचं आयोजन साताऱ्यात करण्यात आलं आहे. आता मराठा समाजासाठी एकत्र यायची वेळ आली आहे, म्हणून मी तीन राजांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे मराठा आरक्षणाचा मुद्दा हातात घेऊन रस्त्यावर उतरतील त्यावेळी सरकारला पाळायला जागा मिळणार नाही."