Navneet Rana : नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांविरोधात बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंट कायम
Continues below advertisement
शिवडी महानगर दंडाधिकारी न्यायालयानं खासदार नवनीत राणा आणि त्यांच्या वडीलांविरोधात बजावलेल्या अजामीनपात्र वॉरंट प्रकरणात आज दिलासा दिलेला नाही. त्यामुळं नवनीत राणा यांच्या अडचणी कायम आहेत. अजामीनपात्र वॉरंटवरील कारवाईच्या स्थगितीसाठी नवनीत राणांच्या वकिलांकडून कोर्टात अर्ज सादर करण्यात आला होता. पण त्यांना तातडीचा दिलासा देण्यास कोर्टानं नकार दिला आहे. नवनीत राणा सध्या संसदेच्या कामकाजात व्यस्त आहेत. पण राणांचे वडील आपल्याला सापडत नसल्याची कबुली मुलुंड पोलिसांनी न्यायालयासमोर दिली आहे. मुलुंड पोलिसांच्या उत्तरावर शिवडी दंडाधिकारी कोर्टाची नाराजी व्यक्त केली आहे. दरम्यान, राज्य सरकारला यावर भूमिका मांडण्याचे कोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणाची पुढील सुनावणी पाच जानेवारी रोजी होणार आहे.
Continues below advertisement