Shivajirao Adhalrao Patil : मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा - आढळराव

Continues below advertisement

Shivajirao Adhalrao Patil : मी लोकसभा निवडणूक लढवणार आणि जिंकणार सुद्धा - आढळराव शिवाजी आढळरावांची पुणे म्हाडाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली आहे, मग आता महायुतीकडून शिरूर लोकसभा कोण लढणार? याची उत्सुकता शिगेला पोहचलेली आहे आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्षपद देऊन, त्यांना शिरूर लोकसभेच्या रिंगणात बाहेर तर काढण्यात आलं नाही ना? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला असून मतदारसंघात या चर्चेला उत आलाय. हे असंच घडणार असेल तर मग आढळरावांना म्हाडाचे अध्यक्षपद बहाल करण्याची शाळा नेमकी कोणाची असेल? याबाबत तर्कवितर्क लढवले जातायेत. आता आढळरावांना जर शिरुर लोकसभेच्या रिंगणातून बाहेर काढण्यासाठी ही खेळी खेळली गेली असेल तर मग महायुतीकडून शिरूर लोकसभेच्या रिंगणात कोणता उमेदवार उतरवला जाणार? याबाबतची उत्सुकता आणखीच शिगेला पोहचलेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विद्यमान खासदार अमोल कोल्हेची घोडेस्वारी रोखण्याचा चंग बांधलाय. तसं जाहीर आव्हानच अजित पवारांनी कोल्हेना दिलंय. पण घड्याळाचा चिन्हावर उभं राहणारा आणि कोल्हेचा काटा काढणारा तो तुल्यबळ उमेदवार कोण असणार? शिवाजी आढळरावांना पुणे म्हाडाचे अध्यक्ष पद दिल्यानंतर या चर्चांना पुन्हा उत आलाय.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram