Shivajirao Adhalrao Patil : अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवलं - आढळराव पाटील

Continues below advertisement

Shivajirao Adhalrao Patil : अमोल कोल्हेंनी दत्तक घेतलेल्या गावात आम्ही पाणी पुरवलं -  आढळराव पाटील मी 3 ते साडेतीन लाख मतांनी निवडून येणार, आढळराव पाटील यांनी व्यक्त केला विश्वास. शिरूर मतदार संघाच्या जनतेचा माझ्यावर विश्वास असून 2014 पेक्षा जास्त या निवडणुकीत म्हणजेच 3 ते साडे तीन लाख मतांचा लीड मला मिळणार आहे. तसेच हडपसर मतदार संघातून कमीत कमी एक लाख मतांचा लीड मला मिळणार असल्याचा विश्वास शिरूरचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आढळराव पाटील यांनी व्यक्त केला. जे प्रकल्प पाच वर्षांपूर्वी होते ते आज देखील तसेच आहेत. तीच परिस्थिती आहे. लोक सकाळपासून मला त्यांचे अडीअडचणी सांगत असतात. मी खासदार नसताना देखील काम करत आहे. कोल्हे यांचं कर्तव्य मलाच पार पाडावे लागत असल्याचं यावेळी आढळराव पाटील म्हणाले. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram