Shivajirao Adhalrao Patil : शिरूरची जागा राष्ट्र्वादीकडे गेल्यानं आढळराव पक्ष बदलणार
Continues below advertisement
Shivajirao Adhalrao Patil : शिरूरची जागा राष्ट्र्वादीकडे गेल्यानं आढळराव पक्ष बदलणार शिरूरचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील येत्या २६ तारखेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. आढळरावांचं महायुतीचं तिकीट जवळपास निश्चित आहे. एकनाथ शिंदेंनी जुलै २०२२मध्ये बंड केल्यावर आढळराव त्यांच्यासोबत गेले होते. आजही त्यांचे शिंदेंशी कुठलेही मतभेद नाहीत. पण महायुतीच्या वाटाघाटीत शिरूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे गेली, उमेदवारी मात्र आढळरावांना देण्याचं ठरलं. म्हणून मग एकनाथ शिंदेंनी एकाप्रकारे आपला उमेदवार निर्यात करण्याचं ठरवलं, आणि त्यामुळे आढळराव अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करतायेत.
Continues below advertisement