Govandi : गोवंडीच्या शिवाजीनगर परिसरात अल्पवयीन मुलीवर सामुहिक अत्याचार , दोघांना अटक : ABP Majha
Continues below advertisement
गोवंडी शिवाजी नगर परिसरात एक 17-18 वर्षाच्या तरुणीवर पाच ते सहा जणांनी गॅंग रेप केल्याची घटना समोर येत आहे.घटना सकाळी पाच वाजताची आहे.सकाळी केटरिंग च्या कामावरून ही मुलगी घरी परतत होती.या वेळी या टोळक्याने त्या तरुणीला पकडले आणि बाजूला असलेल्या एका बंद खोलीत नेऊन तिच्यावर गँगरेप करून पळ काढला.तरुणीने बाहेर येऊन आरडा ओरडा केला असतायाची माहिती स्थानिक नागरिकांनी शिवाजी नगर पोलिसांना दिली.घटनेची माहिती मिळताच अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे, पोलीस उपायुक्त कृष्णकांत उपाध्याय घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी पीडित तरुणीला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.तर या प्रकरणी दोन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती मिळते आहे.सध्या पोलिसांनी दहा टीम तयार केल्या असून आरोपींचा शोध घेत असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.
Continues below advertisement