Shiv Jayanti 2021 | साताऱ्यात शिवरायांचा 50 फुटी अश्वारुढ पुतळा; शिवभक्ताने स्वखर्चाने उभारला पुतळा
पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रोहन यादव या शिव भक्त तरुणाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारला असुन मराठ्यांची राजधानी सातारा या नावाने सेल्फी पॉइंट सुद्धा तयार केला आहे. रोहन यादव या शिवभक्तांने शिवजयंती च्या पार्श्वभूमीवर हा आगळा वेगळा उपक्रम करून अनोखी शिवजयंती साजरी केली आहे. छत्रपतींचा इतिहास प्रत्येकाच्या मनात आणखी खट्ट व्हावा हा या मागचा उद्देश आहे.मुंबईपासून बेंगलोर पर्यंत जवळपास एक हजार किलोमीटरचा राष्ट्रीय महामार्ग आहे या महामार्गावर साताऱ्याच्या प्रवेशालाच पन्नास फुटी अश्वारुढ शिवभक्तांसाठी उभारण्यात आला असून या ठिकाणी सेल्फी पॉइंट बनवण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आणि मराठ्यांची राजधानी सातारा या दोन्हींची आठवण राहावी असा उद्देश आहे.या महामार्गावरुन येणारया शिवभक्तांना कायम स्मरणात रहावे यासाठी हा सेल्फी पाॅइन्ट उभारण्यात आला आहे.छत्रपती घराण्याचे 13 वंशज खा.उदयनराजे यांनी या सेल्फी पॉईंट चे अनावरण केले.या वेळी बोलत असताना उदयनराजेंनी मी माझे भाग्य समजतो की मला या सेल्फी पॉईंट च अनावरण करण्याची संधी मिळाली या सेल्फी पॉईंट मुळे सातारा जिल्ह्याचा इतिहास कानाकोपऱ्यात पसरणार असून जिल्ह्याच्या वैभवात भर पडणार असल्याचे सांगितले
Tags :
Shivaji Jayanti 2020 Date Shivaji Jayanti 2021 Chhatrapati Shivaji Maharaj Jayanti 2021 Shiv Jayanti 2021 Shivjayanti 2021 Shivaji Maharaj Jayanti Shivaji Shiv Jayanti Shivjayanti Shivaji Maharaj Satara