Shivaji Adhalrao Patil Speech Manchar : मला फेका फेकी जमत नाही, 'संसदरत्न'वरुन टीका, आढळराव बरसले
लोकसभेतील उल्लेखनीय कामगिरीसाठी मिळणारा संसदरत्न पुरस्कार म्हणजे फसवेगिरीचा प्रकार आहे. या पुरस्कारांचा सरकारशी कोणताही संबंध नसतो. चेन्नईत बसून संसदरत्न पुरस्कार वाटले जातात, असे वक्तव्य शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केले. आढळराव पाटील यांनी मंगळवारी शिरुर येथील कार्यक्रमात अजित पवार यांच्या नेतृत्त्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी आढळराव पाटील यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर टीका करताना संसदरत्न पुरस्कारांच्या विश्वासर्हतेवरच शंका उपस्थित केली. त्यांनी म्हटले की, मलाही दोनवेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे. पण मी तिसऱ्यांदा हा पुरस्कार घेतला नाही. आमचे श्रीरंग बारणे यांना आठ वेळा संसदरत्न पुरस्कार मिळाला, यावरुन ओळखा हा संसदरत्न पुरस्कार काय आहे? अमोल कोल्हे हे संसदरत्न पुरस्कार घेऊन टेऱ्या बडवत आहेत, अशी टीका शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केली.