Shivsena vs Rane | कोकणात शिवसेना-राणे वादानंतर काय असेल राजकीय परिस्थिती? WEB EXPLAINER

Continues below advertisement
सिंधुदुर्ग : नारायण राणे आणि शिवसेना यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रृत आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर नारायण राणे यांनी कायमच आपल्या धारदार शब्दांनी शिवसेनेवर 'प्रहार' केले. तर, शिवसेनेनं देखील त्याच ताकदीनं राणेंवर 'निशाणा' साधला. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हे दोन्ही जिल्हे शिवसेनेचं बालेकिल्ले. त्यानंतर नारायण राणे यांचे पुत्र निलेश राणे या लोकसभा मतदार संघातून खासदार झाले. असं असलं तरी त्यांचा पराभव करत, अगदी नारायण राणे यांचा पराभव करत शिवसेनेनं पुन्हा एकदा कोकणात आपली सत्ता कायम असल्याचं दाखवून दिलं. मध्यंतरीच्या काही काळात कोकणातील राजकीय वातावरण तसं शांत होतं. आरोप - प्रत्यारोप यापुरताच सारं काही मर्यादित होतं. पण, आता मात्र कोकणात पुन्हा एकदा नारायण राणे आणि शिवसेना यांच्यात जोरदार वाकयुद्ध रंगलं आहे. कार्यकर्ते थेट रस्त्यावर उतरले आहेत. भाजप कार्यकर्ते किंवा राणे समर्थक खासदार विनायक राऊत यांचा प्रतिकात्नक पुतळा जाळत आहेत. अशाच प्रकारची प्रतिक्रिया शिवसेना कार्यकर्ते दखील देताना दिसून येत असल्यानं कोकणात ऐन थंडीच्या मोसमात राजकीय गर्मागर्मी अनुभवायला मिळत आहे. विनायक राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर टिका केली आणि त्यानंतर दोन्ही बाजुचे नेते क्रियेला प्रतिक्रिया देताना दिसून येत आहेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram