Latur Shivsena : लातूरमध्ये शिवसैनिकांचा संताप, शासकीय विश्रामगृहात तोडफोड
Continues below advertisement
लातूर येथील शासकीय विश्रामगृहात शिवसेना उमाटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. बैठकीसाठी शिवसैनिकांनी शासकीय विश्रामगृहातील हॉलची मागणी केली होती. कर्मचाऱ्यांनी अचानकपणे हॉल उपलब्ध करून देता येणार नाही, अशी माहिती दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले. संतापलेल्या शिवसैनिकांनी हॉलच्या काचेचे दरवाजे फोडले. त्यांनी आपला संताप व्यक्त केला. या घटनेमुळे शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात गोंधळ निर्माण झाला. शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी पुढील कारवाई सुरू करण्यात आली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement