Thane MNS-Shivsena Protest :शिंदेंच्या ठाण्यात ठाकरेंची शिवसेना-मनसेचा एल्गार, पालिकेवर भव्य मोर्चा
Continues below advertisement
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात, ठाण्यात, ठाकरे बंधूंच्या पक्षांनी एकत्र येत शक्तिप्रदर्शन केले. ठाणे महापालिका प्रशासनाच्या कारभाराविरोधात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने संयुक्त मोर्चा काढला. यावेळी बोलताना माजी आमदार रमेश कोरेगावकर म्हणाले, 'आज ठाकरे ब्रँड ठाण्यामध्ये दिसून येईलच'. गडकरी रंगायतनपासून ते महापालिका भवनापर्यंत निघालेल्या या मोर्चात दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमले होते. शिवसेनेची मशाल आणि मनसेचे इंजिन एकाच मोर्चात दिसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. अधिकृत युतीची घोषणा झाली नसतानाही ठाकरे बंधूंच्या पक्षांचा हा तिसरा संयुक्त मोर्चा असल्याने सर्वांचे लक्ष याकडे लागले होते. या मोर्चाच्या माध्यमातून ठाण्यातील नागरी समस्या आणि प्रशासनातील भ्रष्टाचाराचा मुद्दा उपस्थित करण्यात आला.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement