Shiv Sena Symbol EC Hearing : शिंदे गटाच्या याचिकेत अनक त्रुटी, कपिल सिब्बल यांचा दावा
Continues below advertisement
शिवसेना कुणाची, उद्धव ठाकरेंची की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची? मूळ शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला देणार याची उत्तरं आज मिळण्याची शक्यता आहे. केंद्रीय निवडणूक आयोगासमोर थोड्याच वेळात याबाबत महत्त्वाची सुनावणी होणार आहे. ठाकरे आणि शिंदे या दोन्ही गटांनी कागदपत्रं सादर केल्यानंतर निवडणूक आयोग काय निर्णय देतं याकडे साऱ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. त्यात उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुखपदाची मुदत येत्या २३ जानेवारीला संपणार आहे. त्यामुळं संघटनात्मक निवडणुका घेण्यासाठी आणि प्रतिनिधी सभा बोलावण्यासाठी परवानगी देण्याची मागणी ठाकरे गटाने केली आहे.
Continues below advertisement
Tags :
Shiv Sena Maharashtra Political Crisis 'Eknath Shinde Election Commission Of India : Uddhav Thackeray