Shiv Sena Symbol Case: धनुष्यबाण कोणाचा? Supreme Court मध्ये 12 नोव्हेंबरला अंतिम सुनावणी, Thackeray गटाचं भवितव्य ठरणार?

Continues below advertisement
शिवसेना (Shiv Sena) पक्ष आणि धनुष्यबाण या निवडणूक चिन्हाच्या मालकीवरून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटात सुरू असलेल्या वादावर सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court) १२ नोव्हेंबरपासून अंतिम सुनावणीला सुरुवात होणार आहे. २०२२ मध्ये केंद्रीय निवडणूक आयोगाने (Election Commission) शिंदे गटाला मूळ पक्ष आणि चिन्ह देण्याच्या निर्णयाला ठाकरे गटाने आव्हान दिले आहे. 'शिवसेना पक्ष आणि या पक्षाचं निवडणूक चिन्ह असलेल्या धनुष्यबाण कोणाचा', या तीन वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मुद्द्यावर आता सर्वोच्च न्यायालयात फैसला होणार असल्याने, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. विशेषतः आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या निकालाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात उत्सुकता आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola