Shiv Sena Sambhaji Brigade Clashes : सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट-संभाजी ब्रिगेड आमनेसामने

Continues below advertisement

Shiv Sena Sambhaji Brigade Clashes : सावरकरांच्या मुद्द्यावर ठाकरे गट-संभाजी ब्रिगेड आमनेसामने

 

शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यातील युती नंतर नाशिकमध्ये संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या  निमित्ताने  मेळावा आयोजित करण्यात आला होता. 
पहिल्याच मेळाव्यात शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांच्या भूमिकेवरून मतभेद दिसून आले, ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी संभाजी ब्रिगेडच्याच व्यासपीठावरून ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यां खडसावत चांगल्याच कान पिचक्या दिल्यात. मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे  यांनी आपल्या भाषणात स्वतयंत्रविर सावरकर यांच्यावर टीका केली, टीका करतांनाच बाबासाहेब आंबेडकरांचा एका भाषणाचा संदर्भ दिला.  बाबासाहेब आंबेडकरांनी सावरकरांवर टीका करताना   सावरकरांचा तोंडातून  नरक  बाहेर पडला आहे त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करा असा संदर्भ दिला.   त्यांच्या याच विधानावर जाधव यांनी आक्षेप घेतला. तुमची आमची युती असली तरीही बोलण्याचे भान ठेवा या शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याना सुनावले. सावरकर हे मोठेच होते, पण त्यांच्या बाबत बोलण्याचा अधिकार आपल्याला नाही, बाबासाहेब आंबेडकर काय बोलले तो त्यांचा अधिकार होता आपला नाही ही माणसं त्यात्या वेळी मोठीच होती.
तुमचे मत असले तरीही जेव्हा एका व्यासपीठावर एकत्र येतो।तेव्हा भान।ठेवा तुम्ही आंबेडकर बनण्याचा प्रयत्न करू नका आम्ही करणार नाही. माझी उध्दव साहेबांकडे तक्रार केली तरी चालेल पण असे बोलू नका.
मी अंदमानात जाऊन।सावरकर कुठल्या परिस्थितीत राहिले असतील हे बघून आलोय या शब्दात सावरकर विषयी आपली आत्मीयता व्यक्त केली. मेळावानंतर माध्यमांशी बोलतांना भास्कर जाधव यांनी आपण शिवसेनेची भूमिका मांडली अशी प्रतिक्रिया दिली, तर संभाजी ब्रिगेडच्या पदाधिकारीनीही आम्ही सावरकरांच्या बाबतीत आमच्या भूमिकेवर ठाम आहोत असे सांगितले ज्या वेळी एका व्यासपीठावर येऊ त्याबाबत काय बोलायचे ते नंतर ठरवू याचा युतीवर परिणाम होणार नाही असा दावा केला. मात्र शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यां पहिल्याच मेळाव्यात दोन्ही संघटना मध्ये वादाची ठिणगी पडली आहे. त्यामुळे दोन्ही संघटना युती टिकविण्यासाठी पुढे काय काळजी घेतात, की त्यांच्यांत मतभेदांची दरी वाढत जाणार हे बघणे महत्वाचे आहे.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram