Matoshri Meeting: मातोश्रीवर बैठक, उद्या होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी
हिंदीच्या मुद्द्यावर उद्या होणाऱ्या सभेसाठी शिवसेनेची जोरदार तयारी सुरू आहे. संजय राऊत, दीपक पवार यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली. उद्या सभा आणि त्रिभाषा सूत्राच्या शासन निर्णयाची होळी केली जाणार आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, माकप, भाकप या पक्षांनी पाठिंबा दिला आहे. 6 एप्रिल 2025 ते 17 जून 2025 या कालावधीतील हिंदीच्या सक्तीच्या तिसऱ्या भाषेच्या शासन निर्णयाची होळी करण्यात येणार आहे.