Maharashtra Politics : राज्याला मिळणाऱ्या मदतीवरुन आरोप-प्रत्यारोप, शिवसेनेची केंद्रावर टीका
नैसर्गिक संकटात केंद्राकडून राज्याला मिळणाऱ्या मदतीवरून पुन्हा आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. एसडीआरएफच्या निकषांमध्ये बदल करण्याच्या मागणीकडे केंद्रानं अद्याप लक्ष दिलेलं नाही, अशी टीका शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी केलीय. केंद्राकडे राज्याचे ५५ हजार कोटी येणं असल्याचं सांगत त्यांनी केंद्राकडून मिळणाऱ्या मदतीबाबत नाराजी व्यक्त केलीय.