Sanjay Raut PC | सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा वापर राजकीय फायद्या तोट्यासाठी : संजय राऊत
सुशांत सिंह राजपूत प्रकरणी मुंबई पोलिसांचा तपास सुरु असताना बिहार सरकार सीबीआयची मागणी करते, केंद्र सरकार त्याला लगेच मान्यता देते. ज्या घाईघाईने घडामोडी घडवल्या जात आहे त्यामुळे संशय येत आहे. सत्य बाहेर येऊ नये यासाठी पडद्यामागून कोणीतरी हालचाली करत असल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
राऊत म्हणाले, सुशांत सिंग राजपूत प्रकरणाचा राजकीय फायद्या तोट्यासाठी काही लोक वापर करत आहे. हे अत्यंत तो घृणास्पद आहे. मुंबई पोलिसांनी तपास पूर्ण करावा. आणि तपासानंतर यावर टीका करण्यास काही हरकत नाही कारण देशात लोकशाही आहे. परंतु मुंबई पोलिस हे उत्तम आहे. अनेक महत्त्वाच्या प्रकरणाचा तपास त्यांनी केला आहे.
Tags :
SSR Suicide Case Sanjay Raut Pc Shiv Sena MP Sushant Singh Rajput Sushant Singh Rajput Suicide Case Sanjay Raut