Shiv Sena MP 2024 : बारणे, माने, भुमरे, म्हस्के; निकालानंतर शिंदेंचा खासदार 'माझा'वर

Loksabha Election Result : लोकसभा निवडणुकीमध्ये (Loksabha Election Result) शिवसेना शिंदे गटाने 15 पैकी सात जागा जिंकल्या आहेत. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी देण्यात आली आहे. संसदेत शिवसेना गटनेते म्हणून श्रीकांत शिंदे यांच्या नावावर खासदारांनी एकमत केलं आहे. उद्या (7 जून) खासदारांच्या बैठकीनंतर हा निर्णय जाहीर केला जाणार आहे. दिल्लीमध्ये एनडीए खासदारांची बैठक होणार आहे. 

इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना

दरम्यान, आज (6 जून) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या नव्या खासदारांची बैठक घेत खासदारांचे अभिनंदन केले. तसेच इंडिया आघाडीतील कोणत्याही नेत्याच्या संपर्कात न राहण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी आपल्या खासदारांना दिल्या आहेत. बैठक वर्षा बंगल्यावर पार पडली. या बैठकीमध्येच खासदारांना सूचना देण्यात आला. दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज दिल्लीला परवाना होणार आहेत. तत्पूर्वी, शिवसेनेच्या नवनिर्वाचित खासदारांसाठी स्नेहभोजन आयोजित करण्यात आले होते. यावेळी त्यांनी खासदारांचं अभिनंदन केले. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola