Raj Thackray Speech : विलास भुमरेंच्या भाषणाचा दाखला देत राज ठाकरेंचा हल्लाबोल
Continues below advertisement
पैठणचे (Paithan) शिवसेना आमदार विलास भुमरे (Vilas Bhumre) यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या उपस्थितीतच त्यांनी हे विधान केले. 'मी बाहेरून स्वतः वीस हजार मतदान आणलं होतं, त्या निवडणुकीत मला त्या मतदानाचा शंभर टक्के फायदा झाला,' असे वक्तव्य विलास भुमरे यांनी केले. छत्रपती संभाजी नगरमध्ये (Chhatrapati Sambhaji Nagar) एका सभेत बोलताना भुमरेंनी हे विधान केले, मात्र त्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी इशारा करताच त्यांनी सारवासारव केली. माझ्या मतदारसंघातील जे वीस हजार मतदार स्थलांतरित झाले होते, त्या लोकांना मी मतदानाच्या दिवशी मतदानासाठी परत आणले होते, असे स्पष्टीकरण भुमरेंनी दिले. या प्रकरणानंतर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका करत याला 'व्होट-चोरी' (Vote-Chori) असल्याचे म्हटले आहे. काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) आमदाराविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement