ABP News

Shiv Sena MLA Disqualification :ठाकरे गटाचे अध्यक्षांवर गंभीर,हे पुरावे मला का नाही दाखवले?-नार्वेकर

Continues below advertisement

Shiv Sena MLA Disqualification : ठाकरे गटाचे अध्यक्षांवर गंभीर, तर हे पुरावे मला का नाही दाखवले? - नार्वेकर

आमदार अपात्रता प्रकरणात काल आणखी एक अध्याय घडला. काल दोन मोठ्या पत्रकार परिषदा पार पडल्या. एक होती ठाकरे गटाची महापत्रकार परिषद तर त्यानंतर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी पत्रकार परिषद घेतली. शिवसेना पक्ष एकनाथ शिंदेंकडे देण्याचा नार्वेकरांचा निर्णय चुकीचा आहे, २०१३ आणि २०१८ साली केलेली घटनादुरुस्ती अध्यक्षांनी जाणूनबुजून लक्षात घेतली नाही, असे आरोप ठाकरे गटानं केले. युक्तिवादाला आधार म्हणून २०१३ आणि २०१८ साली झालेल्या कार्यकारिणी बैठकीचे व्हिडीओ देखील दाखवण्यात आले. माझं पद जर बेकायदेशीर होतं, तर २०१९ साली अमित शाह मातोश्रीवर का आले होते, असा सवाल देखील ठाकरेंनी उपस्थित केला. 
तर दुसरीकडे, विधानसभा अध्यक्षांनी ठाकरे गटाचे सर्व आरोप खोडून काढले. शिवसेनेच्या घटनेची कुठली प्रत ग्राह्य धरायची, याचा अधिकार माझ्याकडे नव्हता, प्रत निवडणूक आयोगाकडून मागवून घ्या, असे आदेश सुप्रीम कोर्टानं दिले होते, याची आठवण नार्वेकरांनी करून दिली. तसंच, अनिल परब जे २०१८च्या घटनादुरुस्तीचं पत्र वारंवार दाखवतात, त्यात घटनदुरुस्तीचा उल्लेखच नाही, त्यात केवळ पक्षातील निवडींची माहिती आहे, असा खुलासा देखील नार्वेकरांनी केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram