Bharat Gogawale | गोगावलेंचं राणेंबद्दल वादग्रस्त विधान; राजकारणात प्रतिक्रिया उमटल्या
शिवसेना मंत्री भरत गोगावले यांनी नारायण राणे यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. गोगावले यांनी म्हटले, 'राणे एवढ्या उंचीवर जाण्यासाठी अंगावर केसेस घेतल्या, भानगडी केल्या, जेलमध्ये गेले, मारामारी केली, मर्डर केले.' या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावू नये असे प्रताप सरनाईक यांनी सांगितले. तर वैभव नाईक यांनी गोगावले यांचे वक्तव्य योग्य असल्याचे म्हटले आहे. भरत शेकणे यांनी या वक्तव्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.