Tanaji Sawant | बंडखोर तानाजी सावंतांवर शिवसेना कारवाई करणार? | ABP Majha
शिवसेनेचे आमदार आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांच्या विरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी वाढली आहे. तानाजी सावंतांनी घेतलेल्या शिवसेना विरोधी भूमिकेमुळे शिवसैनिकांचा तानाजी सावंतांवर रोष आहे. दरम्यान आज दुपारी सोलापूर आणि उस्मानाबाद येथील कार्यकर्त्यांची मातोश्रीवर आढावा बैठक बोलावली आहे. मात्र या बैठीकाला तानाजी सावंतांच्या अनुपस्थितीमुळे शिवसैनिकांमधील नाराजी आणखी वाढली असून त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी, अशी केली जात आहे.