ZP Election | जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेनेच्या तानाजी सावंतांची भाजपला साथ | ABP Majha
Continues below advertisement
शिवसेनेचे आमदार, माजी मंत्री तानाजी सावंत यांनी उस्मानाबाद जिल्हा परिषद निवडणुकीत बंडखोरी केली आहे. महाआघाडीत आपल्या पुतण्याला उपाध्यक्षपद मिळत नसल्याने तानाजी सावंत यांनी भाजपसोबत घरोबा केला आहे. बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: तानाजी सावंत यांच्याशी संपर्क साधला. त्यानंतर अनिल देसाई यांनी त्यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. मात्र तानाजी सांवत यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
Continues below advertisement