Shiv Sena Foundation Day : शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन, 58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली ?

Continues below advertisement

Shiv Sena Foundation Day  : शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन,  58 वर्षांत शिवसेनेनं कोणती वादळं झेलली ? 

19 जून रोजी शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन आहे. 58 वर्षे झालेल्या या शिवसेना पक्षात शिवसेनेतील पक्ष फुटीनंतरची आता ही दुसरी वेळ आहे. यामध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे, दुसरीकडे एकनाथ शिंदेंची शिवसेना हा आपला वेगळा वर्धापन दिन साजरा करणार आहे.

शिंदे यांची शिवसेना वरळी डोम येथे शिवसेना पक्षाचा वर्धापन दिन साजरा करणार आहे. वरळी डोम येथे मोठे शक्तीप्रदर्शन वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिंदेंच्या शिवसेनेकडून केलं जाईल. सायंकाळी पाच वाजता या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाला सुरुवात होईल. 

ठाकरेंच्या शिवसेनेचा वर्धापन दिन यंदाच्या वर्षी सुद्धा षण्मुखानंद सभागृहात साजरा केला जाणार आहे. वर्धापन दिनाला स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे. ठाकरे कुटुंबियांसोबत  ठाकरेंचे सर्व आमदार खासदार जिल्हाप्रमुख संपर्कप्रमुख आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित राहतील. त्यामुळे इथे सुद्धा एक मोठं शक्तीप्रदर्शन होईल.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram