Shivsena Dasara Melava Teaser | बाळासाहेबांचे शिवसैनिकच ब्रँड', एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा टीझर

Continues below advertisement
शिंदेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचा दुसरा टीझर रिलीज झाला आहे. या टीझरमधून ठाकरे बंधूंना टोला लगावण्यात आला आहे. टीझरमध्ये म्हटले आहे की, "महाराष्ट्रमध्ये ब्रँड फक्त एकच बाळासाहेबांचे शिवसैनिकच." हिंदुत्वाचं देणं असं देखील यात म्हटले आहे. दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार, हिंदुत्वाचा हुंकार, स्वाभिमानी भगव वादल, वाघाची भगवी डरकाई, मराठमोली आरूई आणि शिवसेनेचा फड असे वर्णन केले आहे. जगाला दाखवून देऊ या की, या महाराष्ट्रात ब्रँड फक्त एकच, बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिकच असे आवाहन करण्यात आले आहे. जिथे बाळासाहेबांचे विचार, तेच आमच्यासाठी शिवतीर्थ आहेत असेही टीझरमध्ये नमूद केले आहे. महाराष्ट्राचा रंग भगवा होता, आहे आणि कायम भगवाच राहणार असे ठामपणे सांगितले आहे. बाळासाहेबांचं भगव स्वप्न कडवे शिवसैनिकच पूर्ण करणार असेही म्हटले आहे. हिंदुत्वाचं देणं भगव्याचं लेणं असे सांगत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचं सोनं लुटायला येण्याचे आवाहन केले आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola