Shiv Sena Disqualification Case : आमदार अपात्रता सुनावणीत सुनील प्रभूंची साक्ष

Continues below advertisement

आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी आज विधानसभा अध्यक्षांसमोर झाली. आता उद्यापासून २४ नोव्हेंबरपर्यंत रोज सुनावणी होणार आहे. त्यानंतर ३ दिवसांच्या सुट्टीनंतर २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबरपर्यंत सलग सात दिवस अध्यक्षांकडे सुनावणी होणार आहे. व्हीप बजावणाऱ्या कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचीही साक्ष नोंदवली जाईल. रविवारी ३ डिसेंबरलाही सुनावणी असणार आहे. आमदार अपात्रता सुनावणीत आज ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची साक्ष झाली. सुनील प्रभू यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी यांनी केला. इंग्रजी भाषेतील याचिका, शिवसेना भाजप युतीत लढलेल्या २०१९ च्या विधानसभा निवडणुका, तसंच याचिकेत शिंदे गटावर आणि भाजपवर केलेले आरोप यांवरून जेठमलानी यांनी प्रभूंची उलटतपासणी केली. याचिकेत भाजपवर करण्यात आलेल्या आरोपांचा उल्लेख १८ नोव्हेंबर २०२३च्या शपथपत्रात मात्र का नाही असा सवाल जेठमलानींनी प्रभूंना केला. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram