Shiv Sena Dasara Melawar : दसरा मेळाव्यावरुन दोन्ही शिवसेना पुन्हा मैदानात
Shiv Sena Dasara Melawar : दसरा मेळाव्यावरुन दोन्ही शिवसेना पुन्हा मैदानात
बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्याची सुरूवात ३० ऑक्टोबर १९६६ रोजी केली. त्याला आता ५७ वर्ष झाली. मात्र आता महाराष्ट्रात दोन शिवसेना आहेत. त्यामुळे गेल्यावर्षी शिवाजी पार्कसाठी शिंदे आणि ठाकरे गटाचा जोरदार संघर्ष झाला होता. तसाच संघर्ष यंदाही होण्याची चिन्ह निर्माण झालीयत. कारण, शिवाजी पार्कात मेळाव्याच्या परवानगीसाठी दोन्ही गटांनी महापालिकेत अर्ज केलेत. शिंदे गटाच्या सदा सरवणकर यांनी तर ठाकरे गटाच्या स्थानिक नेत्यांकडून पालिकेला परवानगीसाठी पत्र देण्यात आलंय. त्यामुळे, शिवाजी पार्कवर यंदा कुणाचा आवाज घुमणार? ठाकरेंचा की शिंदेंचा. याकडे सगळ्यांचे डोळे लागलेयत.