meal scheme I 10 रुपयांत जेवण शक्य; पुण्यातील शिवसैनिकाचा यशस्वी प्रयोग I एबीपी माझा
Continues below advertisement
पुण्यातील शिवसेनेचे विभागप्रमुख दत्तात्रय जाधव यांनी गेले वर्षभर अवघ्या 10 रुपयांमध्ये जेवण देण्याची योजना यशस्वी करुन दाखवलीय. 23 जानेवारी 2019 ला म्हणजे बाळासाहेब ठाकरेंच्या जयंतीला पुण्यातील रास्ता पेठेत सुरु झालेल्या या उपक्रमाची माहिती स्थानिक नेत्यांकडून उद्धव ठाकरेंना देण्यात आली. त्यानंतर त्यांनी शिवसेनेच्या विधानसभा निवडणुकीसाठीच्या वचननाम्यात त्याचा समावेश केला. दत्तात्रय जाधव आणि कसबा पेठेतील शिवसैनिकांकडून चालवल्या जात असलेल्या या योजनेचा लाभ दररोज चारशे ते पाचशे लोकांना होतो. दररोज दुपारी एक ते तीन या वेळेत रस्ता पेठेत ही अवघ्या 10 रुपयांमध्ये मिळणारी थाळी खाण्यासाठी लोकांची गर्दी उसळते.
Continues below advertisement